आज उदगीरच्या तिघांचे स्वॅब तपासणीत अहवाल निगेटिव्ह : 4 पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज

आज उदगीरच्या तिघांचे स्वॅब तपासणीत अहवाल निगेटिव्ह : 4 पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज
लातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यात उदगीरच्या तीन जणांची तपासणी करण्यात आली. या तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3, बीड 7, उस्मानाबाद 34 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. 
दरम्यान उदगीरच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचार घेत असलेल्या चार रुग्णाची तब्येत चांगली झाली असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज