शहरात कोरोटांईग करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत : राज्यमंत्री सजय बनसोडे

शहरात कोरोटांईग करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत : राज्यमंत्री सजय बनसोडे
उदगीर: उदगीर शहरात बाहेर जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यामधून आलेल्या नागरिकांना कोरोडांईग करण्यात येत आहे.या नागरिकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर येथे आज आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला लातुरचे अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, पोलीस उप अधिक्षक श्री जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे नगरपालिका मुख्यधिकारी श्री राठोड उपस्थित होते.
उदगीर शहरात मागील आठवड्यात कोरोना पाँझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर शहरात काही कंटोमेट झोन तयार केले आहेत तेथे आवश्यक त्या सुविधा घरपोच देण्यात येत आहेत. या झोनमध्ये दूध, पाणी, मिडीकल सुविधा पुरविण्यात येत आहेत. या भागातील सतरा हजार नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या भागावर व उदगीर शहरावर ड़ोन कँमेरा व सी.सी.टीव्ही  यांने लक्ष ठेवण्यात येत आहे. शहरात सर्वत्र फवारणी करण्यात आली आहे.कोरोना संदर्भात उपाययोजना बाबत निधीची कमतरता पडु देणार नाही
पुढील आठवड्यात पर जिल्ह्यातील नागरिक आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात येतील तेव्हा प्रत्येकाची तपासणी व प्रत्येकाला कोरोडांईग करण्यात यावे विनापरवाना येणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करावा.येणाऱ्या काळात शहरात सुद्धा अँन्टी कोरोना फोर्स तयार करावी. स्वस्त धान्य दुकानातून या महिन्यातील धान्य दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात यावे.या सोबत पुढील काळात शहरात पाणी टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सुचना राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम)राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बैठकी दरम्यान केल्या.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image