महाराष्ट्र विद्यालय निलंगा चे 2019- 20 मध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये घवघवीत यश निलंगा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्याकडून घेण्यात येणार्‍या जिल्हास्तर विभाग तर व  राज्यस्तरावर महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी डॉजबॉल स्पर्धेत दहा खेळाडू, रग्बी स्पर्धेत 12 खेळाडू, युनिफाईड स्पर्धेत आठ खेळाडू,कुडो स्पर्धेत नऊ खेळाडू,आष्टी डू आखाडा दहा खेळाडूनी स्पर्धेत राज्यस्तरावर सहभाग झाला तसेच विभागीय पातळीवर टेनिक्वाईट,हॉकी,बॉक्सिंग सॉफ्टबॉल, नेहरू हॉकी इत्यादी खेळात सहभाग नोंदवला तसेच डॉजबॉल स्पर्धेत अल्फिया बेग या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन या विद्यार्थिनीला सुवर्णपदक प्राप्त झाले या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब,महाराष्ट्र शिक्षण समितीचे उपाध्यक्ष आदरणीय विजयकुमार पाटील निलंगेकर,महाराष्ट्र विद्यालयाचे  मुख्याध्यापक आ.आर.के.पाचंगे,उप मुख्याध्यापक पवार डीडी सर, परिवेक्षिका देशमुख मॅडम तसेच क्रीडाशिक्षक सय्यद मुजीब,शिवाजी पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे अभिनंदन केले.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज