*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*

 *संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*.




निलंगा:-भाजपा महायुतीचे निलंगा विधानसभेचे अधिकृत उमेदवार लोकनेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांना मतदान रुपी आशीर्वाद देण्यासाठी  केतकी संगमेश्वर मंगल कार्यालयात बंजारा समाज बांधवांचा आशीर्वाद मेळावा संत सेवालाल महाराज यांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. 

*यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की,बंजारा समाजाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर तांडा व वस्तींचा सुधार व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या कामाला गती देण्याचे कार्य महायुती सरकारने केले आहे. समाजाच्या हितासाठी असलेल्या लोककल्याणकारी योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातीलच लोकांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. यामुळे आता आगामी काळामध्ये बंजारा समाजाच्या विकासाचा अनुशेष पूर्णपणे भरून निघेल, असा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही देखील यावेळी दिली.


याप्रसंगी *महंत शेखरजी महाराज यांनी आपले आशीर्वचन देताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे लवकरच आपल्या आजोबांप्रमाणे राज्याचे नेतृत्वकरतील, असे आशीर्वाद दिले*. मेळाव्या दरम्यान बाबाजी राठोड यांच्या सप्तसूर बंजारा ऑर्केस्ट्राने उपस्थित सर्वांची मने जिंकली.   

यावेळी  वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी राठोड, प्रकाशजी चव्हाण, वसंतरावजी राठोड, विक्रमजी चव्हाण, बाबाजी राठोड, विशालजी चव्हाण, तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, विधानसभा प्रभारी दगडूजी सोळुंके, उत्तमजी राठोड, वाल्मिकीजी चव्हाण, अरविंदजी जाधव, शेषेरावजी ममाळे, चंद्रहंसजी नलमले,रामजी कलगे, माधवजी पितळे, नटकरे मामा आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज