मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके

मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके 



निलंगा/प्रतिनिधी: निलंगा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने निलंगा तालुक्यातील मौजे मसलगा येथे कॉग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार अभय साळुंके यांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांशी संवाद साधताना मरेपर्यंत २४ तास जनतेच्या सेवेत राहीण अशी भावनिक साद घातली. मसलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून ग्रामदैवत हनुमानरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यावेळी मसलगा गावातील तरुणांनी अभय साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निलंगा पंचायत समिती चे माजी सभापती अजित माने, बसपुर चे चेअरमन गंगाधर चव्हाण, नूर पटेल, विकास पाटील, भगवान पाटील, श्रीकांत साळुंके, बब्रुवान जाधव, हणमंत पाटील, अक्षय पाटील आदी कॉग्रेस च्या प्रमुखांची उपस्थिती होती.


सत्ताधाऱ्यांना गावात जाण्यासाठी साधा रस्ता करता आला नाही, तो गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गावची अनेक कामे अपूर्ण आहेत. तालुक्याच्या आमदाराने जिल्ह्याचे, राज्याचे नेतृत्व केले परंतु तालुक्याचा म्हणावं तितका विकास झाला नाही. अशी खंत गावकऱ्यांनी कॉग्रेस उमेदवार अभय साळुंके यांना बोलून दाखवली.


 तुमच्या २४ तास सेवेत राहिलो आणि यापुढे राहील, यात शंका नाही. निवडणूक २० दिवसांची आहे पण तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. निटूर जिल्हा परिषद गटाचा सदस्य असताना अनेक विकासकामे मार्गी लावली. सामान्य कुटुंबातील माणसाला निवडून देत मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचार करून महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप १५० लोकांच पाप  घेण्याचं काम केलं असल्याचे अभय साळुंके यांनी सांगितले.


                  यावेळी मसलगा गावातील चेअरमन बाबासाहेब पाटील, बालाजी पिंड, सतीष जाधव, संजय नरहारे, श्रीमंत पाटील, चंद्रशेखर पाटील, माधव मोहिते , माधवराव पाटील, अण्णाराव पाटील, राम पिंड , दिनकर बनसोडे, नरसिंग जाधव, पप्पु तेलंगे, सोनेराव बनसोडे, पृथ्वीराज पाटील, योगेश पाटील, दत्ता जाधव, धीरज मोहिते, विक्की पाटील, मेघराज पाटील, सुरज मोहिते, रवि पवार,  माधव पवार, उमेश पाटील, रवि शिंदे, अंगद शिंदे, भास्कर शिंदे, मेघराज शिंदे, लिंबराज बनसोडे, हारी तेलंगे, राजेश पिंड, दिगंबर पिंड, आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*