विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन

 विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका

  -  डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन 

 


   

    लातूर/प्रतिनिधी:

निवडणुकीच्या काळात अपप्रचार करून मतदारांना भ्रमित करण्याचे काम केले जाते. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी अशा प्रचाराला बळी पडू नये,असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.

      गोजमगुंडे लॉन्स येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने आयोजित मेळाव्यात डॉ.

अर्चनाताई पाटील बोलत होत्या.या मेळाव्यास शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे यांच्यासह माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,शैलेश गोजमगुंडे, सरचिटणीस दिग्विजय काथवटे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे,प्रदेश सचिव मुर्तुजा खान, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (जोगेंद्र कवाडे) गटाचे आर.टी.कांबळे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष मोहसीन खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात विकास कामांवर न बोलता मतदारांची दिशाभूल करण्याचे काम केले जाते.या निवडणुकीतही विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अपप्रचार सुरू आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या काळात सतर्क रहावे. कुठल्याही प्रकारची गडबड होऊ शकते,याची जाणीव ठेवा.अफवांना बळी पडू नका. प्रचारादरम्यान आपण विकास कामांवर बोलतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना नागरिकांना समजावून सांगा.लाडकी बहीण, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या योजनांची माहिती नागरिकांना द्या,असे आवाहनही त्यांनी केले.

     दि.२० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीचे सरकार आणण्यासाठी मदत करा,असे आवाहनही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले.

   यावेळी बोलताना ॲड. बेद्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करत असल्याची ग्वाही दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी डॉ.

अर्चनाताईंच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले.प्रशांत पाटील यांनी शहराच्या पूर्व भागातील प्रश्नांसंदर्भात स्थानिक नेतृत्वाने काय केले ? असा अहवाल उपस्थित केला.निष्क्रिय नेतृत्वाला घरी बसवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत,असे आवाहनही त्यांनी केले.

     सचिन दाने यांनी विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

    भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी आता मतदानासाठी अल्प काळ शिल्लक असून अर्चनाताईंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देण्याचे आवाहन केले.मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे यांनी शहराच्या पूर्व भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.या 

मंडळात ६५ बुथ आणि २४ शक्ती केंद्र आहेत.या सर्व बुथवर ताईंना मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

    या मेळाव्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळातील सर्व बुथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज