*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
*जळकोट तालुक्याचा मागील २५ वर्षाचा विकासाचा बॅकलाॅग भरुन काढला*
*बॅरेजेसमुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती*
*जळकोट* : उदगीर जळकोट मतदार संघाचा मास्टर प्लॅन तयार करून दोन्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकास मागील पाच वर्षाच्या काळात केला आहे या कालावधीत विविध शासकीय इमारती सर्व जाती धर्माचे सभागृह विविध महापुरुषांचे पुतळे रस्ते वीज पाणी व आरोग्याच्या सुविधा पुरवून जळकोट तालुक्याचा मागील 25 वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढला असून जळकोट तालुक्यात मिनी एमआयडीसी आपण मंजूर केली आहे. भविष्यात आपल्या तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या ठिकाणी मोठे उद्योग उभारून पुन्हा एकदा जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मला या निवडणुकीत आशिवार्द द्यावे असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे हे
जळकोट तालुक्यातील गावभेट दौरा निमित्त वांजरवाडा व इतर गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी माजी आ.गोविंद केद्रे,माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, माजी उपसभापती रामराव बिरादार,माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचद्रं तिरुके,
सभापती विठ्ठल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, चंदन पाटील नागरगोजे, सत्यवान पांडे, सत्यवान दळवे, सोमेश्वर सोप्पा, विनायक जाधव, अर्जुन आगलावे, रामराव राठोड, अॅड.तात्या पाटील, अमोल निडवदे, सतिश सुळे महाराज, अविनाश नंळदवार,राम टाके,बबन बनाळे,रंगनाथ देशमुख,राजु कदम,संदीप आगलावे,व्यंकटी केसाळे, बालाजी केंद्रे, अरविंद नागरगोजे, शिवराज भोंग,रामचंद्र गुरुमे,दत्ता इंदुरे,रामचद्रं गोताळे,दत्ता कुंडले,किसन सोनकांबळे,रामराव गोरखे,मुस्तफा शेख,संतोष इंदुरे,पुंडलिक खंदाडे,रामदास परिट,खादर लाटवाले,रामराव गुट्टे,बाबुराव गुट्टे,राम चोले, रत्नमाला पाटील,मुक्ताबाई आजगुळे, रुक्मिणबाई पदमपल्ले,वंदना धुले,संगीता बंडे,विनोद गुरुमे,रमाकांत रायेवार, आकाश वाघमारे, धनुरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपल्या जळकोट तालुक्याची ओळख ही डोंगरी तालुका म्हणून होती मात्र मागील पाच वर्षाच्या काळात कोल्हापुरी बंधारे व तिरु नदीवर बॅरेजेस उभारून या तालुक्याला पाणीदार तालुका म्हणून नवी ओळख दिली.
विविध इमारतीसह भौतिक सुविधा उपलब्ध करुन देवून मागील पाच वर्षात या जळकोट तालुक्याचा व वाडी तांड्यांचा सर्वांगीण विकास करुन तालुक्याचा चेहरामोहरा बदलला, या भागातील शेतक-यांची गैरसोय होवु नये म्हणून महावुतरणचे जाळे निर्माण केले. तालुक्यातील जोडणारे सर्व रस्ते हे राष्ट्रीय महामार्गाने जोडून इतर रस्ते हे हाँटमिस्क केले. दळणवळण,आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत आत आपण आपण उदगीर जिल्हा निर्मितीकडे वाटचाल चालु करत असुन विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे. येत्या काळात पश्चिम महाराष्टासारखा आपल्या मतदारसंघ विकास करणार असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली आहे.
यावेळी जळकोट तालुक्यातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
गावभेट दौरा करताना ना.संजय बनसोडे यांचा प्रत्येक गावातील महिलांनी औक्षण करुन आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
यावेळी ना.बनसोडे यांनी होकर्णा, उमरदरा, चाटेवाडी, केकतसिंदगी, वडगाव, सोरगा, शेलदरा, उमरगा रेतु, जगळपुर, येलदरा, आदी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.
******************************
addComments
टिप्पणी पोस्ट करा