येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा 

   - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर 




   निलंगा/प्रतिनिधी :

महायुतीने समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून विविध योजना आखल्या व राबवल्या आहेत.या योजना अधिक ताकदीने व गतीने यापुढेही राबविल्या जाणार आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सुखी,समृद्ध जीवन जगता यावे यासाठी देशाचा,राज्याचा व मतदारसंघाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुतीला साथ देत पुन्हा एकदा राज्याची सत्ता हाती द्या.निलंगा मतदारसंघातूनही महायुतीच्या विजयासाठी कमळाचे बटन दाबा असे आवाहन माजीमंत्री आ.

संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

    विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने आ.

निलंगेकर यांनी सुरू केलेली आशीर्वाद यात्रा बुधवारी धनगरवाडी कवठाळा,विळेगाव येथे पोहोचली.ठिकठिकाणी नागरिकांना संबोधित करताना आ.निलंगेकर बोलत होते.यात्रेदरम्यान तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके,जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील,शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,माजी जिप सदस्य प्रशांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

    उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की,निलंगा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे झाली आहेत.विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे. नागरिकांचे जीवनमान सुधारले असून तरुणांना रोजगार,महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण यावर काम सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हे आपले ध्येय असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले.

    नागरिकांची एकी, विश्वास आणि प्रेमामुळेच निलंगा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर धावत आहे.ही निवडणूक मतदारसंघाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे सर्वांनी सावध राहत विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे,असेही आ. निलंगेकर म्हणाले.

     महायुतीने राज्याच्या विकासाचे निर्णय घेतले त्याच पद्धतीने मतदारसंघातील जनतेसाठी आपण कायमच काम करत आहोत.जनहिताच्या योजना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही आ.निलंगेकर यांनी यात्रेदरम्यान बोलताना सांगितले.

    धनगर वाडी येथे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे,माजी सरपंच हनुमंत बिराजदार, जगन्नाथ बोडके,लहुजी बोडके,माधव बोडके, कवठाळा येथे जिल्हा बँकेचे संचालक भगवानदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल इंगोले,देवणी बाजार समितीचे माजी सभापती बालाजीराव बिराजदार, संगम पताळे,माजी पंस सदस्य महेश सज्जनशेटे, व्यापारी आघाडीचे राजकुमार हुडगे,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रंजना पोलकर, आणि विळेगाव येथे मान्यवरांसह आठवले गटाचे उपजिल्हाप्रमुख अंकुश ढेरे,प्रशांत पाटील दवण हिप्परगेकर,

उषाकिरण बिराजदार, राज गुणाले,सुधीर भोसले,विजय मुक्के,बुथ प्रमुख अनिल जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज