लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार
संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर
लातूर :- जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णीसंख्यात विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्या्च्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण जिल्हयात संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्या्ने लातूर जिल्ह्यात दिनांक 15जूलै 2020 ते दिनांक 30 जूलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या कालावधीत विविध आस्थापना व सेवांसंदर्भात या आदेशाद्वारे सविस्तर निर्देश निर्गमीत करण्यात येत आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व आस्थाापना दिनांक 15 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत पूढील निर्देशांना अधिन राहुन संपुर्णपणे बंद राहतील. सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते यांची दुकाने दिनांक 15जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा दुकान न उघडता घरपोच करता येईल. किराणा मालाचे ठोक विक्रेते यांची दुकाने दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील, इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
Zomato, Swigy व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा दि. 15 जूलै 2020 पासून ते दिनांक 30जूलै 2020 रोजीचे पर्यंत बंद राहील. सार्वजनिक/ खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk व Evening walk प्रतिबंधीत राहील. उपहारगृह बार, लॉज, हॉटेल्स (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील.
सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा / आडत / भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार / फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत केवळ ठोक विक्रीचे ठिकाणे भाजी मार्केट / फळे विक्रेते दुपारी 10.00 वाजेपर्यंत चालू राहतील व किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12.00 वाजेपर्यंत घरपोच सेवा (स्टॉल न लावता) पुरविता येईल.
मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी ची विक्री दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यत चालु राहतील. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैदयकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील.
सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पोे, ट्रेलर, ट्रॅक्टतर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोणा विषाणू प्रतिबंधात्माक उपाययोजनांचे काम करणारे लातूर महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्याावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.
सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था (In-Situ construction) असेल तरच त्यांना काम सुरु ठेवता येईल. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागु करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल.
सामाजीक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्कृतीक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मीक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. E-Commerce सेवा उदा. Amazon, Flipkart व तत्सम सेवा दि. 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 पर्यत संपूर्णतः बंद राहतील. तदनंतर दिनांक 21 जूलै 2020 पासुन चालू राहतील. सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्मशानभुमीच्या बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील.
तथापि, पूढील अत्यावश्यक बाबी/ सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील. दुध विक्री व वितरण सकाळी 10.00 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील. तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांळचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णा्लय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहील.
ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्यालगत असलेली औषध विक्री दुकाने दिनांक 15 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत 24 तास सुरु ठेवता येतील. इतर ठिकाणी असलेले मेडीकल दुकाने दिनांक 15जूलै 2020 ते 30 जूलै 2020 सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत सुरु ठेवता येतील.
सर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्था्निक संस्थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्य् असल्यास Work from home चा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही, तथापि स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, आरोग्य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे ( घरगुती गॅस वितरक, पिण्याहचे पाणी पुरविणारे, इत्यादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात येईल. स्वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्यक राहील. एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे.
औदयोगीक व इतर वस्तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य् वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यमवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 06.00 ते 09.00 या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील. पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्याता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंका दिनांक 15 जूलै 2020 ते 20 जूलै 2020 या कालावधीत फक्त शासकीय व्यावहाराचे कामकाज करता येईल. खाजगी ग्राहकांना प्रवेश नसेल. दिनांक 21 जूलै 2020 ते 30 जूलै 2020 या कालावधीत नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.
संपूर्ण लातूर जिल्ह्यातील मा. न्यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्यायाधीश, वकील,शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्या्वश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा, आरोग्य व स्ववच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळया दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे व विज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्टेमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वतः करीता फक्तत) वाहन वापरण्यांस परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 07.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. अन्नी पक्रीया (Food Processing) व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उदयोग, कारखाने सुरु ठेवता येतील, मात्र कर्मचा-यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्था्पनांनी work from home चा पर्याय वापरावा. अत्यावश्यतक वाहनांना साहित्य पुरविणारे अॅटोमोबाईल्स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्ती दुकाने यांना सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आस्थाीपना सुरु ठेवता येतील.
सर्व वेद्यकीय, व्यवसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठी परवानगी राहील. वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्त अत्या्वश्यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्यांच्या व कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील. वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सरु राहतील. अंत्याविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील.
संपुर्ण लातूर जिल्ह्यात 65 वर्षावरील सर्व व्यक्ती आणि जोखमीचे आजार (मधुमेह, उच्चह रक्तमदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग HIV बाधित रुग्णू इत्यादी) असलेल्या, व्यक्ती , गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा शिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय कोणतेही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी अथवा दोन चाकी वाहन घेऊन फिरणार नाही, इतर कोणतेही व्यक्ती वाहन घेऊन फिरत असल्यास त्याचे चारचाकी / दुचाकी वाहन जप्त करण्याात येईल. त्याचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल व त्याच्यावर साथरोग नियंत्रक कायदयातील तरतुदीनुसार व तत्सम कायदयानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल.
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेले कोवीड-19 च्याा व्यवस्थाापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे सर्वाना बंधनकारक आहे. तसेच सर्व आस्था्पना प्रमुखानी त्यांच्या अधिनस्तक कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी त्यांच्या मोबाईलमध्येे आरोग्य् सेतु अॅप डाऊनलोड केल्यांची खात्री करावी. आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून संभाव्य लागण विषयी सुचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो.
उपरोक्त् आदेश सर्व संबंधिताना स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील प्राप्त् अधिकाराचा वापर करुन एकतर्फी काढण्यात आलेला आहे.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्कााळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती, व्यवस्थाापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा