डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद

डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी

पदयात्रेद्वारे साधला संवाद 


लातुरकरांच्या सुख- समृद्धीसाठी देवतांना साकडे 





लातूर/प्रतिनिधी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी कॉँग्रेस,रिपाई महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी दीपावली निमित्त शनिवारी (दि. 2) गावभागातील श्री बालाजी मंदिर,स्वयंभू श्री केशवराज मंदिरात महाआरती करुन दर्शन घेतले.लातुरकरांना सुख- समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली.पदयात्रेद्वारे व्यापारी आणि नागरिकांशी संवादही साधला.

    डॉ.अर्चनाताई पाटील यांनी या या भेटीत नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा केली.

दीपावलीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला.नागरिकांनी डॉ. अर्चनाताईंना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

    शहरातील देव-देवतांचे दर्शन घेतल्या नंतर त्यांनी गंजगोलाई भागातील सराफ लाईन मध्ये सराफ व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांना   भेटी दिल्या.

    डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासोबत गणेश गोमसाळे,पृथ्वी बायस,मीना गायकवाड, माणिकराव आलूरे,ॲड. अमित जोशी,माजी नगरसेवक दिलीप धोत्रे, अशोक गिल्डा,वल्लभ वावरे,आशा आयाचित, सुजाता पतंगे,विद्या जोशी,अनिता पतंगे आदींची उपस्थिती होती.

      ठिकठिकाणी नागरिकांकडून डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. नागरिक व व्यापाऱ्यांनी पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले. महिलांनी ताईंचे औक्षण करत आपण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.व्यापाऱ्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी ताईंच्या कानावर घातल्या.

टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज