'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर

 'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू'

  -  डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर 



छत्रपती शिवाजी महाराज मंडळाची बैठक 


  लातूर/प्रतिनिधी :

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापला बुथ व गड सांभाळावा. निश्चितच आपली फतेह होणार आहे,असा विश्वास लातूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.

अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केला.

   छत्रपती शिवाजी महाराज मंडळातील बुथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ.पाटील बोलत होत्या. मंचावर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,मंडल अध्यक्षा शोभाताई पाटील,शैलेश लाहोटी, सुनिल होनराव,माजी शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, अविनाश कोळी,विवेक बाजपाई,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाने,दिनेश बोरा, रिपाईचे जिल्हाध्यक्ष डी.ई.सोनकांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना डॉ.

अर्चनाताई म्हणाल्या की, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार करताना केवळ परिचय पत्र वाटू नयेत तर मतदारांशी संवाद साधावा.मतदान का करायचे आहे ? हे त्यांना सांगावे.जे मतदार बाहेरगावी राहतात त्यांच्या याद्या तयार करून त्यांच्याशी संपर्क करावा.प्रचारासाठी जे साहित्य उपलब्ध होईल त्याचे वाटप व्यवस्थित करावे,अशी सुचना त्यांनी केली.

   या मंडळातील बहुतांश बुथवर लोकसभा निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळाले.ही बाब कौतुकाची असली तरी जो बुथ आपल्या पाठीशी आहे त्या बुथवर अधिकाधिक मतदान करून घेत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी दिल्या आहेत. 

       कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अर्चनाताई म्हणाल्या की,लातूर मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.ही निवडणूक आव्हानात्मक असली तरी संस्मरणीय करता येऊ शकते.मतदारांशी अधिक संपर्क साधा.तुमच्या साथीने ही निवडणूक आपण जिंकणारच आहोत.निवडणुकीमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात.त्यांना तोंड देण्यास तयार रहा. आपण प्रधानमंत्री मोदी यांचे शिलेदार असून कुठल्याही अडचणीचा सामना करण्यास तयार राहू,असे त्या म्हणाल्या.

     पदाधिकाऱ्यांनी प्रचार करताना विरोधकांवर टीका करू नये.आपल्या यशाची चर्चा करावी. शासनाच्या विविध योजनांची माहिती मतदारांना द्यावी. महिलांनी लाडकी बहीण सारख्या प्रभावी योजना मतदारांना सांगाव्यात, असे आवाहनही डॉ. अर्चनाताई पाटील यांनी केले.

      बैठकीस मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकट बेद्रे यांनी लातूरचे जुने वैभव परत मिळविण्यासाठी,शहराचा विकास करण्यासाठी डॉ.

अर्चनाताई पाटील चाकूरकर या योग्य उमेदवार असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.लातूर हे व्यापारी व शैक्षणिक शहर असून आता औद्योगिक क्षेत्रात ओळख निर्माण करत आहे.त्यासाठी राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे.आपल्या उमेदवार महिला असून त्या शक्तीचे रूप आहेत.निवडणुकीत कोणालाही दुखवू नका.हे सांघिक काम असून एकजुटीने काम केल्यास यश निश्चित मिळते,असे ते  म्हणाले.

   शहराध्यक्ष देविदास काळे यांनी प्रत्येक बुथवर २५ मते वाढविण्याचे आवाहन केले.मंडलाध्यक्ष शोभाताई पाटील यांनी आपल्या उमेदवार महिला असल्याचा अभिमान असल्याचे सांगून भावांनी बहिणीच्या विजयासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.सुनिल होनराव यांनी या मंडळातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले.शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांनी मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यास यंत्रणा राबविण्याची सूचना केली.गुरुनाथ मगे गणेश हेड्डा,दिनेश बोरा,श्वेता लोंढे,गोरोबा गाडेकर, शितल मालू,अनंत गायकवाड,वर्षा कुलकर्णी,सुनिल मलवाड, ॲड.दीपक मठपती यांनीही निवडणुकी संदर्भात सूचना केल्या.

   या मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन शैलेश लाहोटी तर आभार प्रदर्शन गिरजाप्पा मुचाटे यांनी केले.या मेळाव्यास छत्रपती शिवाजी महाराज मंडळातील ४४ बुथचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज