माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
उदगीर : होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपचे नेते राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीची उमेदवारी दाखल केली होती. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. राजेश्वर निटुरे आपल्या पत्नीचा अर्ज मागे घेणार की, ठेवणार? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवार स्वाती हुडे यांना दिलासा मिळाला आहे.
नगर परिषद निवडणुकीत उदगीरच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपामध्ये हुडे परिवारातील महिलेला उमेदवारी मिळणार की निटुरे परिवारातील महिलेला उमेदवारी मिळणार याबाबत चांगलीच रस्सीखेच लागली होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची उत्कंठा कायम ठेवत भारतीय जनता पक्षाने माजी नगरसेवक सचिन हुडे यांच्या पत्नी स्वाती सचिन हुडे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजेश्वर निटुरे यांनी आपल्या पत्नीच्या नावाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राजेश्वर निटुरे हे भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते असून उदगीर शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी धोक्याची बनली होती. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उदगीरचे आमदार माजी मंत्री संजय बनसोडे आदी मान्यवरांनी विनंती केली. सर्व नेत्यांच्या विनंतीला मान देत आपण आपल्या पत्नीची उमेदवारी मागे घेत असल्याचे माध्यमाशी बोलताना राजेश्वर निटुरे यांनी सांगितले. ही उमेदवारी मागे घेत असताना उदगीरच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करीत युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे व भाजपाचे अन्य नेते मंडळीच्या उपस्थितीत राजेश्वर निटुरे यांनी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. निटुरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन मुळे यांना चांगला दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार  : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज