जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम: शिवजयंतीचे औचित्य जाधव हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न उदगीर : येथील डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या जाधव हॉस्पिटलमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत मधुमेह, रक्तदाब व इतर रोगनिदान तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सचिव विवेक सुकणे होते. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता जाधव, तालुकाध्यक्षा पुष्पाताई जाधव, डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. शिल्पा जाधव, सिद्धेश्वर लांडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव अनिता जगताप यांनी केले. आभार संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्षा प्रतिभा मुळे यांनी मानले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.