ईश्वर समगे यांची युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड उदगीर : येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते ईश्वर समगे यांची युवक काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे यांनी समगे यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले असून आ. दिलीपराव देशमुख, ना. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश्वरराव निटूरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व युवकांचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा या नियुक्ती पत्रातून करण्यात आली आहे. शिवाय सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी असे आवाहन करण्यात आले आहे. ईश्वर समगे यांची युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंह चुडासमा, जिल्हा प्रभारी अभय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज