कारवा फाउंडेशनचा तृतीय पंथीयांना मदतीचा हात संचारबंदीमुळे होत होती उपासमार: महसूल प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे शहरातील तृतीयपंथी नागरिकांची होत असलेली उपासमार दूर करण्यासाठी कारवा फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला असून तीन आठवडे पुरेल इतके धान्य त्यांना देण्यात आले आहे. शहरातील 15/20 तृतीयपंथीयांची कोरोनामुळे त्यांचेकडे पुरेसे अन्नधान्य व्यवस्था नसून उपासमार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे काही तृतीयपंथी व काही नागरिक यांनी प्रशासनास कळवून काही व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन त्यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाना आवाहन केले होते. त्यास उदगीर शहरातील कारवा फौंडेशन यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत महसूल प्रशासन उदगीर व कारवा फौंडेशन उदगीर यांनी किमान तीन आठवडे पुरेल एवढे गहु आटा, तांदूळ, तेल ,तिखट, मीठ इत्यादी अन्नधान्य उदगीर येथील नालंदा नगर येथे घरी जाउन तृतीयपंथी यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कारवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आदिती पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज