*आपत्तीच्या_या_काळात_शेतकऱ्यांचे_योगदान* *कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना फळे व भाजीपाला घेण्यासाठी भाजी मंडई होणारी गर्दी कमी करण्यासाठी आत्मा योजनेने घेतला पुढाकार* उदगीर : आज दि. 31 मार्च 2020 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ), तालुका कृषी अधिकारी कार्यालय,उदगीर तर्फे उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या फिरत्या वाटप गाडीचे उद्घाटन उदगीरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले. या प्रसंगी उदगीरचे उपनगराध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, नगरसेवक मनोज पुदाले नगरसेवक, ऍड. दत्ताजी पाटील तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण , खरात व ज्यांच्या पुढाकाराणे हे सुरू झाले ते आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर इ. उपस्थित होते. अश्याप्रकारे आनखी फिरत्या गाड्यांची सुरवात होणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.