वासवी महिला मंडळातर्फे महिलांची आरोग्य तपासणी: महिला दिन उदगीर : येथीलआर्य वैश्य वासवी महिला मंडळातर्फे तर्फे जागतिक महिला दिना निमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी दोनशे महिलांंची तपासणी झाली. डाॅ प्राजक्ता शेरे,डाॅ.तृप्ती दाचावार, डाॅ.श्रद्धा वट्टमवार ,डाॅ.करूणा मलशेटवार यांनी महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वासवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाताताई पंदिलवार, सौ. शुभांगी वट्टमवार,सौ. राधिका वट्टमवार,सौ.मनिषा पारसेवार, सौ. शितल बलशेटवार, संध्या पत्तेवार यांच्यासह मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.