उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 26 स्वॅबपैकी 18 अहवाल निगेटिव्ह; तर 3 अहवाल पॉझिटिव्ह

उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 26  स्वॅबपैकी 18  अहवाल निगेटिव्ह; तर 3 अहवाल पॉझिटिव्ह


2 व्यक्तींची पुनर्तपासणी होणार तर 3 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित


लातूर, :-  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26.04.2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 26 व्यक्ती, चाकुर येथील 1 व्यक्ती व या संस्थेतील 7 असे एकुण 34 कोरोना (कोविड 19) संशयित व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी या संस्थेतील 7 व चाकुर येथील एका व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे या दोन व्यक्तींचे 48 तासानंतर स्वॅब घेवून पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहेत. 
 आज दिनांक 27.04.2020 रोजी उदगीर येथील 30, अंबाजोगाई येथील 2 व या संस्थेतील 1 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी  प्रक्रिया चालु आहे अशी माहिती  डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी दिली.
                 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज