खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन रुग्णालये सुरू ठेवावीत -राज्यमंत्री संजय बनसोडे

खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन रुग्णालये सुरू ठेवावीत
-राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी या आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये सामाजिक भान ठेवून आपली रुग्णालये सुरू ठेवावेत. व रुग्णालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा देऊन प्रशासनास सहकार्य करावे असे असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, भूकंप पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथे आयोजित खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची रुग्णालय चालू ठेवण्याबाबत च्या बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी वैद्यकीय उपसंचालक डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गंगाधर परगे,वैद्यकीय अधीक्षक डॉ पवार, घन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन चे डॉ चंबुले लायन्स नेत्र रूग्णालयाचे डॉ रामप्रसाद लखोटीया यासोबतच माजी आमदार सुधाकर भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, काँग्रेसचेजिल्हा अघ्यक्ष व्यंकट बेद्रे, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, पोलीस उप अधीक्षक मधुकर जवळकर, नगरपालिका मुख्यघिकारी भरत राठोड, बी.डी.ओ.अंकुश चव्हाण, तहसीलदार व्यंकटेश मुंडे उपस्थित होते.
संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, कोरोना या साथरोग नियंत्रण ठेवण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. ही आणीबाणची परिस्थिती आहे या काळात राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा दिवस रात्र काम करीत आहे. या परिस्थिती खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार्या डॉक्टरांनी आपले सहकार्य द्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यात भविष्यात कोरोना हाँस्पिटल, कोरोना मोबाईल व्हाँन,फिवर क्लिनिक उभे करण्यासाठी सहकार्य व योगदान द्यावे. या परिस्थिती डॉक्टर यांना लागणार्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या साठी निधीची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
उदगीर येथील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपली रुग्णालये या आपत्कालीन परिस्थिती सुरू ठेवावे तसेच रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत म्हणून नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी तसेच आरोग्य विभागाने खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना त्यांच्या स्तरावरून आरोग्य सेवा या आपत्तीच्या कालावधीत नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत, असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सूचित केले. यावेळी खाजगी डॉक्टरांना येणाऱ्या समस्या बाबतही चर्चा करण्यात आली. 


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image