गरिबांच्या फ्रिजला कोरोनाची बाधा...!: उदगीर

गरिबांच्या फ्रिजला कोरोनाची बाधा...!
उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम गरीबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाच्या विक्रीवरही झाला असून यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची उपासमार होत आहे.
उन्हाळा आला की सामान्य माणूस थंड पाणी पिण्यासाठी मातीपासून बनविलेल्या माठाची खरेदी करण्यासाठी गर्दी करतात, पण सध्या सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे या गरीबाच्या फ्रिजलाही कोरोनाची बाधा झाली असून या माठाची विक्रीच थांबली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागु केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाणे वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा आदेश सरकारने काढला. शिवाय जनतेला रस्त्यावर येण्यासाठी निर्बन्ध लावण्यात आले आहेत. 
मातीच्या माठाची विक्री ही रस्त्यावरच केली जाते. गेल्या पंधरा दिवसापासून रस्त्यावर येण्यास बंदी असल्याने ग्राहकच येत नाहीत या माठाची विक्री करणारे व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे.
उदगीर शहरात सध्या दरवर्षी पोलीस स्टेशनच्या समोर हे व्यापारी बसून असतात पण सध्याच्या परिस्थितीमुळे हे व्यापारीही घरातच बसून असल्याने याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
मातीच्या माठाचा व्यापार करणारे गोरख रुईकर यांनी सांगितले की, मेहनत करून माठ बनवून विक्रीला आणले होते, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे माठाची विक्री चक्क थांबली आहे. आपले सहा सात माणसाचे कुटुंब असून पुढचा काळ कसा घालवायचा याची चिंता लागल्याचे सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज