कोरोना कम्युनिटी क्लिनिक व कोरोना मोबाईल व्हॅनचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोना कम्युनिटी क्लिनिक व कोरोना मोबाईल व्हॅनचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता याचा संसर्ग जास्त होऊ नये यासाठी उदगीर मध्ये कोरोना कम्युनिटी क्लिनिकची निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदगीर शहरातील विविध भागात नऊ ठिकाणी कोरोना कम्युनिटी क्लिनिक उभे करण्यात येणार आहेत. यात करोना सदृश लक्षणे असणाऱ्या म्हणजे, सर्दी, ताप,खोकला, श्वास घ्यायला त्रास असणे यावर उपचार करण्यात येणार आहेत. 
या क्लिनिक मध्ये सरकारी डॉक्टर तसेच खाजगी डॉक्टर सेवा देणार आहेत. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच क्लिनिक असावे यामुळे शहरात या रोगाचा प्रसार होण्यास आळा बसेल त्या परिसरातील नागरिक तेथे उपचार घेतील या दवाखान्यात काम करणाऱ्या खाजगी डॉक्टर यांना यावेळी मा.मंत्रीमहोदयाच्या हस्ते पी. पी. ई. किट चे (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट ) वाटप करण्यात आले.
यासोबत करोना मोबाईल व्हँन याचेही उद्घाटन करण्यात आले आहे ही व्हँन शहरातील विविध भागात फिरून ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आहे त्यांना तेथेच उपचार करेल या सोबतच करोना संदर्भात नागरिकाचे चाचणी साठीचे नुमणे तपासणी साठी याच व्हँनचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे कोरोना रुग्णाकडुन इतर नागरिकांना संक्रमण होण्याची शक्यता कमी होईल असे मत राज्याचे राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वैद्यकीय उपसंचालक डॉ. एकनाथ माले,उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी ,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, डॉ. पवार, डॉ. देशपांडे तसेच निमा संघटनेचे, मेडिकल असोसिएशन चे अनेक डॉक्टर उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज