मुख्यमंत्री रिलीफ फंडाला ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा निधी जिव्हाळा ग्रुपकडूनही पाच हजाराचा निधी

मुख्यमंत्री रिलीफ फंडाला ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा निधी
जिव्हाळा ग्रुपकडूनही पाच हजाराचा निधी
उदगीर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उदगीर येथील ग्रीन आर्मी या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री रिलीफ फंडाला दहा हजार रुपये तर जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पाच हजार रुपयाचा निधी देण्यात आला.
गेल्या पंधरा दिवसापासून देशात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. संसर्गामुळे होणाऱ्या या आजाराचे रुग्ण दैनंदिन वाढत असल्याचे चित्र आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक, स्वयंसेवी संस्था यांना मुख्यमंत्री रिलीफ फंडाला निधी देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून अनेकांनी निधी दिला आहे. उदगीर येथेही पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवड व संगोपनासाठी कार्य करणाऱ्या ग्रीन आर्मी व विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जिव्हाळा ग्रुप या दोन सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडाला निधी देण्याचे ठरविले. त्यानुसार ग्रीन आर्मीच्या वतीने दहा हजार रुपयांचा तर जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पाच हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री रिलीफ फंडात ऑनलाइन जमा करण्यात आला. 
दरम्यान लॉकडाऊनमुळे उदगीर शहरात अडकून पडलेल्या आंध्रप्रदेशातील विद्यार्थ्यांना दोन दिवस जेवणाची सोयही ग्रीन आर्मी व जिव्हाळा ग्रुपने केली.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही