उदगीर शहरातील नागरिकांनी आरोग्य पथकांना आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे -राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर शहरातील नागरिकांनी आरोग्य
पथकांना आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे
-राज्यमंत्री संजय बनसोडे लातूर/उदगीर :- उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी एका 70 वर्षे वयाच्या महिला रुग्णाला कोरोनाची लागण झाली व त्यानंतर थोड्याच वेळात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने उदगीर शहरात तीन दिवसाचा कडेकोट कर्फ्यूचे आदेश जारी केले. तसेच शहराचा तीन किलोमीटरच्या परिघात येणारा भाग हा कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. या झोन मध्ये आरोग्य विभागामार्फत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तरी उदगीर शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य पथकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उदगीर शहरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपयोजनाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच जो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे त्या भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य तपासणी करावी तसेच उदगीर शहरात प्रशासनाने जाहीर केलेला कर्फ्यु ची अधिक कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आरोग्य तपासणी कामात संबंधित प्रभागातील नगरसेवक तसेच उदगीर शहरातील मौलवी मार्फतही नागरिकांनी आरोग्य तपासणी च्या कामात सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात यावे अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी उदगीर शहरात जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोन'ची पाहणी केली तसेच उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व नर्स आदी कर्मचाऱ्यांना कोरंटईन केलेल्या लखोटिया हॉस्पिटलला भेट दिली.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image