उदगीरात आज चार नवे कोरोनाचे रुग्ण: एकूण सात बाधितावर उपचार

उदगीरात आज चार नवे कोरोनाचे रुग्ण: एकूण सात बाधितावर उपचार


लातूर : कोरोनाबाधित वयोवृद्ध मयत महिलेच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले असून, उदगीरच्या सामान्य रुग्णालयात आता एकूण ७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत मयत महिलेसह उदगीरमध्ये एकूण ८ जणांना लागण झाली आहे. त्याचवेळी एकट्या उदगीरमधून घेतलेल्या १०५ स्वॅबपैकी मयत महिलेच्या संपर्कातील ९८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 


बुधवारी १६ स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील १५ निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह आला, तर २८ एप्रिल रोजी तपासणी झालेले व प्रलंबित राहिलेले तीन अहवालही आले असून, ते पॉझिटिव्ह आहेत. या संदर्भात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले, आतापर्यंत बाधित वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर उदगीरमधून आलेले एकूण १०५ स्वॅब तपासले आहेत. पहिल्या टप्प्यात २६ स्वॅब घेतले होते. त्यातील २१ निगेटिव्ह आले. ३ पॉझिटिव्ह आले. तर दोन स्वॅब पुनर्तपासणीला पाठविले. तसेच वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांचे ३० स्वॅब तपासले, तेही सर्व निगेटिव्ह आले. तद्नंतर दुसºया टप्प्यात महिलेच्या संपर्कातील कुटुंबीय व इतरांचे ३५ स्वॅब घेण्यात आले. त्यातीलही ३२ अहवाल निगेटिव्ह आले, तर तीन प्रलंबित होते. सदर प्रलंबित असलेले तिन्ही अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून, ते पॉझिटिव्ह आहेत. तसेच पुनर्तपासणी केलेल्यांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह आहे. 


उदगीरच्या सामान्य रुग्णालयात एकूण ७ बाधितांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील एकूण ३७२ स्वॅबची तपासणी करण्यात आल्याची माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. आजाराची लक्षणे असणाºयांनी व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही