नाफेड तर्फे तूर व हरभरा खरेदी सुरू करा : भरतभाऊ चामले 

नाफेड तर्फे तूर व हरभरा खरेदी सुरू करा : भरतभाऊ चामले 
लातूर: सद्यस्थितीत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका बाजूला कोरोना विषाणूमुळे लॉक डाऊन असल्याने शेतातील माल शेतातच पडून आहे. तर दुसर्‍या बाजूला संचार बंदीमुळे नाफेड तर्फे खरेदी केला जाणारा तूर व हरभरा या शेतमालाची खरेदीही थांबलेली आहे. शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करणे तर दूरच त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतमालाची खरेदी शासनाने करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे संचालक तथा स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ उदगीरचे  चेअरमन भरत चामले आणि उपाध्यक्ष शंकरराव रामचंद्रराव पाटील यांनी एका पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे. 
सदरील मागणीत त्यांनी स्पष्ट केले आहे की, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका वगळता इतर खरेदी केंद्रावर  तूर आणि हरभरा खरेदी चालू आहे. मात्र उदगीर तालुक्यात खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे खरेदी केंद्र चालू करून शेतमाल नाफेड मार्फत खरेदी करावा. अशी विनंती सदरील पत्रान्वये केली आहे. अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी आता या नाफेड मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या तुर व चना खरेदीवर बंधन आल्याने खूप अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची ही गोची थांबवावी. अशी मागणी खरेदी-विक्री संघाच्या वतीने करण्यात आली आहे .शेतात पिकलेल्या द्राक्ष, टरबूज, टोमॅटो या फळफळावळ व भाजीपाला शेतातच सोडून जात आहे. ते नुकसान शेतकरी सहन करत आहेत, परंतु घरी आणून ठेवलेला तूर आणि हरभऱ्याचा माल हा खराब होऊ नये. यासाठी दूरध्वनीवरून लोकप्रिय युवा नेते भरतभाऊ चामले त्यांच्याकडे शेतकरी मागणी करत आहेत. त्या मागणीला धरून खरेदी-विक्री संघाच्या वतीने राज्यमंत्री बनसोडे यांना पत्र देऊन या पत्राच्या अवलोकन करून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना खरेदी केंद्र चालू करण्याची सूचना करावी. अशी विनंती करण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पावसाने देखील शेतमालाचे मोठे नुकसान केले गेले आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यासाठी तूर व हरभरा खरेदी केंद्र चालू करणे योग्य राहील. असेही मत शेतकऱ्यांचे नेते भरत चामले यांनी व्यक्त केले आहे.


 


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image