नगर परिषदेची घरपोच सेवा सुरु नागरिकांना रस्त्यावर न येण्याचे आवाहन

नगर परिषदेची घरपोच सेवा सुरु
नागरिकांना रस्त्यावर न येण्याचे आवाहन
उदगीर : उदगीर शहरात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी रस्त्यावर येऊ नये याकरीता नगर परिषदेच्या वतीने रेड झोन परिसरातील नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा व रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे व मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.
उदगीर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 वर गेली आहे. त्यामुळे शहरातील खडकाळी गल्ली, चर्च रोड डावी बाजू, चौबारा, पंचायत समिती क्वार्टरचा भाग या भागात ९ मे पर्यंत तर मुसा नगर व पीर मुसा नगर या भागात १३ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून हा परिसर सील करण्यात आला आहे. या कालावधीत सदरील भागात येण्या जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तूसाठी बाजारात येता येणार नाही याची दखल घेऊन नगर परिषदेचे अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भारत राठोड यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व अन्य सेवा घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. 
कोरोनाचा फैलाव वाढणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत नागरिकांना घरपोच सुविधा देण्यात येत असून नागरिकानी रस्त्यावर येऊन विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन करीत नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहनही केले आहे.
घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या 14 कर्मचाऱ्यांची आपत्कालीन टीम तयार करण्यात आली असून या टीममधील कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून आपली ऑर्डर द्यावी हे कर्मचारी आपली ऑर्डर घेऊन माल घरपोच आणून देतील अशी माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली. या टीममधील ज्ञानेश्वर काळे (९३७०९९००७८), विशाल आलटे (७०५३१०११०१), किरण पारखे (७४४७२६०४४७), नंदकुमार बीजलगावकर (९४२१३६३०६६), शेख सिकंदर (९८८१९४९९१२), संजय क्षीरसागर (८३९०७०४४९१), अतुल गवारे (७३८७६८०६००), शेख बिलाल (९०२८३४१५४९), शेख इस्माईल (९८६०६५२६२३), उमाकांत गंडारे (९६५७६७१९७७), मनोज बलांडे (७९७२५८९९३०), पठाण इमरान खान (८६६८३५४४१३), शेख अरबाज (८९९९६०३२०८) यांना भ्रमणध्वनीद्वारे सकाळी ७ ते ११ या वेळेत ऑर्डर द्याव्यात, ते सकाळी ११ ते ६ या काळात ऑर्डर घरपोच पोहोच करतील.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image