जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य चंद्रदीप नादरगे यांनी कुंचल्यातून दिला संदेश*

*जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य चंद्रदीप नादरगे यांनी कुंचल्यातून दिला संदेश*


 


 


     उदगीर प्रतिनिधी (दि.)श्री पांडुरंग विद्यालय,कल्लूर येथील कलाशिक्षक चंद्रदीप बालाजी नादरगे यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाबद्दल कुंचल्यातून चित्र साकारुन जनजागृती केली .


तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात ,असे संदेश देणारी अनेक चित्रे रेखाटली आहेत. ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्ये साधून शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा, मावा, मशेरी,पानमसाला, सिगारेट, विडी, ई.) खाऊ थुंकण्यावर बांदी घातली आहे. तंबाखूचे सेवन हे आरोग्याला घातक आहे. असे पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर अथवा परिसरात कुठेही थुंकल्यास कायद्याने बंदी घातली आहे. याच अनुषंगाने उदगीर तालुक्यातील चंद्रदीप नादरगे यांनी समाजात प्रबोधन करण्यासाठी कुंचल्यातून तंबाखूविषयी चित्रे रेखाटली आहेत. 


  चंद्रदीप नादरगे ग्रामीण चित्रकार म्हणून परिचीत आहेत. यापुर्वी कोरोना विषाणू ,मतदान जनजागृती,वसुंधरा ,स्त्री भ्रूणहत्या,एड्स,अंधश्रद्धा,दुष्काळ,मुक्या जीवांचे दुःख, पर्यावरण अशा सामाजिक विषयावर अनेक चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.  


 तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम काय असू शकतात हे सांगणारे विविध चित्रांच्या माध्यमातून चंद्रदीप नादरगे यांनी तंबाखू विरोधी दिनाचे संदेश दिला.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात....*
इमेज