श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्यावतीने ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन
श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्यावतीने विद्यापीठस्तरीय ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनामुळे माणसांची दैनंदिनी एकंदरीत बदलून गेली आहे. यामुळे माणूस हतबल झाला आहे. कोरोनामुळे अनेकजण नेहमीच्या कामापासून दूर आहेत. कोरोना काळातील परिस्थितीचे विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण करावे व आपल्या अभिव्यक्तीला वाट करून द्यावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
वक्तृत्त्व स्पर्धेसाठी कोरोना नंतरचे विश्व, कोरोना महामारीनंतरची शिक्षणव्यवस्था व कोरोना काळातील दैवते असे तीन विषय ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक एक हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय सातशे रुपये व प्रमाणपत्र तर तृतीय पाचशे रुपये व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
सदरील स्पर्धा ही महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता आहे. विद्यार्थ्यांनी कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सात मिनिटाचे व्हिडिओ तयार करावे. सदरील व्हिडिओ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एका भाषेत असवा. स्पर्धकांनी लिंकद्वारे किंवा संयोजकाकडे नाव नोंदणी करावी. स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही. स्पर्धकांचे उत्कृष्ट व्हिडिओ युट्युब व वेबसाईटवर प्रसारित केले जातील. स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 8275939735 व 9270307002 या क्रमांकावर दि. 22 मे ते 5 जून 2020 पर्यंत व्हाट्सअपद्वारे पाठवावेत.
महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.लोहारे ,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, संयोजक डॉ.म.ई.तंगावार व ग्रंथपाल प्रा.ए.जे.रंगदळ यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा