*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा* *जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

*जिल्हयात बाहेरुन आलेल्या लोकांच्या तपासणीसाठी घशातिल द्रव नमूने घेण्यासाठी प्रत्येक आरोग्यकेंद्रात सुविधा ऊपलब्ध करुण दयावी व तपासणी ची गती वाढवा*


*जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
लातूर : संपूर्ण देशभरात 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता आपल्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत अर्ज करून परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात जेवढे नागरिक येतील त्या सर्वांचेच नमुने घेणे आवश्यक वाटते याकरिता सर्व नमुने घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यात सध्या फक्त अहमदपूर , उदगीर , निलंगा, लातूर या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहेत तर या सुविधा वाढवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी सर्व नमुने घेण्याची यंत्रसामग्री व प्रयोगशाळा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना यापूर्वी 14 दिवस क्वारंटाईन केले जायचे परंतु सध्या फक्त पाच दिवस शाळेत व उर्वरित नऊ दिवस घरी क्वारंटाईन करण्याबाबत पत्र मिळाल्याचे कळते. हे अतिशय धोकादायक आहे त्यांना 14 दिवस विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईन करण्यात यावे. 
बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे परंतु काही लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते हा दंड भरू शकत नाहीत तरी या दंडाच्या रकमेबाबत पुनर्विचार करावा अशीही मागणी केंद्रे यांनी केली आहे.
काही तालुक्यांमध्ये तालुका दंडाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय दिसून येत नाही त्यामुळे काही तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, सध्या आरोग्य विभागावर खूप मोठा कामाचा ताण असल्यामुळे त्यांना समजून घेऊन धीर देणे महत्त्वाचे वाटते जेणेकरून ते आणखी जोमाने काम करतील असे म्हणत राहुल केंद्रे यांनीलातूर जिल्ह्याची हद्दबंदी आणखीन मजबूत करणे आवश्यक वाटते, जेणेकरून बाहेरील व्यक्ती आपल्या जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणार नाहीत. जिल्ह्याबाहेरील परवानगी घेऊन लातूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व लोकांच्या swab चे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. असेही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ऊदगीर शहरात बरेच कोरोना संशयित रुग्ण असू शकतात. या करिता कोराना महामारीपासुन जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर तपासण्या होण्याची आवश्यकता आहे.यासाठी मोठया प्रमाणावर मनूष्यबळ व तपासणी केंद्राच्या सोईसुविधा उपलब्ध करुन दयावेत अशी मागणीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image