निटूर येथे बी.बी.एफ पेरणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : उपविभागीय कृषि अधिकारी कदम 

निटूर येथे बी.बी.एफ पेरणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण


शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : उपविभागीय कृषि अधिकारी कदम 


निलंगा, : यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता रूंद, वरंबा सरी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशा पध्दतीची पेरणी म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर असून शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे मत उपविभागीय कृषी आधिकारी श्री. राजेंद्र कदम यांनी शुक्रवारी ता. 29 रोजी केले. 


निटूर ता. निलंगा येथे रुंद वरंबा सरी बी.बी.एफ पेरणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथील शास्त्रज्ञ अमोल वानखेडे, तालुका कृषी आधिकारी संजय नाब्दे, सरपंच परमेश्वर हासबे, मंडळ कृषी आधिकारी रणजीत राठोड, कृषी पर्यवेक्षक संतोष पाटील, 


दिलीप तापडीया, माजी पंचायत सदस्य सुरेंद्र धुमाळ, उपसरपंच संगमेश्वर करंजे यासह आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना माहीती देताना श्री. कदम म्हणाले की, 


शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामामध्ये बीबीएफ पद्धतीचा वापर करून पेरणी करावी या पध्दतीमुळे पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते शिवाय आंतरमशागतीसाठी व कीड नियंत्रण करण्यासाठी याचा फायदा होतो त्याचबरोबर खरीप पेरणी अशा पद्धतीने केल्यानंतर पिकाची उंची वाढते शेंगांची संख्या फळधारणा चांगल्या प्रमाणात होते. यामुळे अंतर मशागत करण्यासाठी सोयीचे होते. त्याचबरोबर खरीप पीक काढणीवेळेस मजुरांची टंचाई लक्षात घेता अशा पद्धतीने पेरणी केलेले पिक हार्वेस्टर यंत्राद्वारे रास करण्यास सोयीचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ श्री. अमोल वानखेडे यांनी बीबीएफ पेरणी तंत्रज्ञाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी श्री संजय नाबदे यांनी केली. तर बियाणे उगवणशक्ती प्रात्यक्षिकबाबत माहीती मंडळ कृषी आधिकारी रणजित राठोड यांनी दिली.


तसेच सोयाबीन उगवण क्षमता व बांधावर खत बियाणे वाटपाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


बीबीएफ वरती पेरणी व बांधावर खत वाटप बद्दल सविस्तर मार्गदर्शन संतोष पाटील यांनी केले. यावेळी कृषी सहाय्यक ए. एस. मस्के, वाय. एन. गिरी, डी एल. कळसे, एस.एस. सोनकांबळे, आत्मा यंत्रणेचे तुकाराम सुगावे आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.