सुधाकर भालेराव यांनी खासदार होऊन जिल्हा सांभाळावा राज्यमंत्री संजय बनसोडे

सुधाकर भालेराव यांनी खासदार होऊन जिल्हा सांभाळावा


राज्यमंत्री संजय बनसोडे


उदगीर : माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाची जिल्ह्याला गरज असून त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचा विचार करू नये, आगामी काळात त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून खासदार होऊन जिल्हा सांभाळावा असे मत राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.


उदगीर येथील लाईफकेअर हॉस्पिटल माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कंपनीमार्फत नव्याने सुरू करण्यात आले असून राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत साई मूर्तीची पूजा करून आज हे हॉस्पिटल आज सुरू करण्यात आले. 


यावेळी बोलताना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपण गेल्या दहा वर्षांत उदगीरचे लोकप्रतिनिधी म्हणून समाधानकारक केले असून आगामी काळात लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेने जनतेची सेवा करायची आहे. आता आपण राजकारणातुन संन्यास घेणार असल्याचे सांगितले.


भालेराव यांच्या भाषणाचा धागा पकडून बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, सुधाकर भालेराव यांनी दहा वर्षे उदगीर मतदार संघाचे दमदार नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाची जिल्ह्याला गरज आहे. पुढील काळात मी उदगीरचे तर भालेराव यांनी जिल्ह्याचे खासदार बनून नेतृत्व करावे, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेलच अन्यथा आघाडीकडून उमेदवारी देण्याचा विचार करू असे सांगण्यासही राज्यमंत्री विसरले नाहीत.


राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलेल्या या विधानामुळे आगामी काळात राजकीय समीकरणं बरीच बदलणार असल्याचे दिसते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज