उदगीर शहरातील नागरिकांवर ड्रोन कॅमेऱ्याने नजर नगर परिषदेकडून पोलीस प्रशासनाकडे ड्रोन सुपूर्द

उदगीर शहरातील नागरिकांवर ड्रोन कॅमेऱ्याने नजर
नगर परिषदेकडून पोलीस प्रशासनाकडे ड्रोन सुपूर्द
उदगीर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर आता ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार असून उदगीर नगर परिषदेने पोलीस प्रशासनाकडे ड्रोन कॅमेरे सुपूर्द केले.
उदगीर शहरात गेल्या आठ दिवसात कोरोनाचे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात दोन कॅन्टोन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या भागात येण्याजाण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याशिवाय शहरात लॉकडाऊन लागू असल्याने लोकांना घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र नागरिक रस्त्यावर विनाकारण येत असल्याचे दिसत आहे. या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ड्रोन कॅमेऱ्याची सोय करण्यात आली आहे. हा कॅमेरा पोलीस प्रशासनाकडे देण्यात आला असून पोलिस प्रशासन या ड्रोन कॅमेरा मधून शहरातील अशा विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर विशेषतः कॅन्टोनंमेन्ट झोनमधील नागरिकांवर लक्ष ठेवणार आहे. या कॅमेऱ्यात कैद झालेल्या लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
हा ड्रोन कॅमेरा पोलिसांकडे देत असताना नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, मुख्याधिकारी भारत राठोड, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, सचिन हुडे, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड यांची उपस्थित होते.
नागरिकांनी सहकार्य करा घरीच बसा: नगराध्यक्ष बागबंदे यांनी यावेळी बोलताना नागरिकांनी घरीच बसून प्रशासनाला सहकार्य करावे तरच कोरोनाला वेळेत आळा बसणार आहे असे मत व्यक्त केले. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या नागरिकांवर ड्रोन कॅमेरातून नजर ठेवण्यात येणार आहे. अशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी दिला.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही