उदगीरच्या आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

उदगीरच्या आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह


लातूर:- दिनांक 25 मे 2020 रोजीचे लातूर जिल्ह्यातील एकुण 19 अहवाल प्रलंबित होते त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी *2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह* आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती लातुर तालुक्यातील मसला येथील असुन दुसरी व्यक्ती दिनांक 23 मे 2020 रोजी हुडको कॉलनी येथे आढळुन आलेल्या पॉझिटीव्ह व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्य आहे. 03 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित (Inconclusive) आले आहेत व एका व्यक्तींचा स्वॅब परिपुर्ण न आल्यामुळे Reject करण्यात आला आहे. 


उदगीर येथील 5 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी *2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह* आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित(Inconclusive) आले आहेत. उदगीर कन्टेन्टमेन्ट झोन येथील पॉझिटिव्ह आलेल्या दोन व्यक्ती ह्या पूर्वीच्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत.


निलंगा येथील 6 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी *सर्वच 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह* आले आहेत. या पॉझिटिव आलेल्या सहा व्यक्ती या निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील असून ते मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत, असे एकुण लातुर जिल्हयातील 19 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, 5 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Reject करण्यात आला आहे, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


 


*लातूर जिल्हा कोरोना अपडेट*


 


* जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या-103


* उपचार घेत असलेले एकूण रुग्ण संख्या-54


* बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या-47


* मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या- 03


* आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात 


येणाऱ्या रुग्णांची संख्या - 03.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image