माजी आमदार भालेराव यांचे अंगणात आंदोलन: सरकारचा निषेध

माजी आमदार भालेराव यांचे अंगणात आंदोलन: सरकारचा निषेध


उदगीर: सध्या राज्यात वाढत असलेली कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या घराच्या अंगणातील निषेध आंदोलनात उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सहभागी होत आंदोलन केले.


गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. वरचेवर रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितिला राज्यातील महा विकास आघाडीचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन राज्यभर पुकारण्यात आले होते. आपल्या स्वतःच्या घरी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रतिसाद देत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या अंगणात हे आंदोलन यशस्वी केले. 


माजी आ. भालेराव यांच्यासह या आंदोलनात अमोल भालेराव, भाजपा महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, जिल्हा उपाध्यक्षा जया काबरा, उषा माने, रमाबाई वाघमारे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज