विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या दोन भावंडाच्या कुटुंबियांना राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते आठ लाखाच्या धनादेशाचे वितरण

विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या दोन भावंडाच्या कुटुंबियांना राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते आठ लाखाच्या धनादेशाचे वितरण


 


लातूर:- जळकोट तालुक्यातील हळदवाढवणा या गावातील एका शेतकरी कुटुंबातील दोन भावंडां ची शेतात काम करत असताना विजेच्या तार्‍याचा धक्का लागून मृत्यू झाला त्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 8 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण हळद वाढवणा येथे जाऊन आज करण्यात आले.


उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, विद्युत वितरण कंपनी लातुर मुख्य अभियंता आर. आर. कांबळे, विद्युत वितरण कंपनी लातुर अधिक्षक अभियंता रवींद्र नरगलीकर, कृ उ बा समिती जळकोट सभापती मनमंत अप्पा किडे, अर्जुन मामा आगलावे, जि प सदस्य बाबुराव जाधव जि प स संतोष तिडके , मोमीनजी काळे, सरपंच संतोष पाटील,अरविंद पाटील, विठ्ठलराव चव्हाण, बाबुराव सुर्यवंशी, संभाजी पाटील, चंद्रशेखर पाटील, गोविंदराव ब्रहमन्ना, किरण पवार, गजानन दळवे, सत्यवान पाटील, संग्राम पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज