दावणगाव येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

दावणगाव येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा


उदगीर : या तालुक्यातील दावणगाव येथे दि. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


दि. ६ जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक झाला होता. छत्रपतीचे राज्य हे रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. जात पात पंथ भेद न मानता छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालविला. त्यांच्या कार्याचा जागर घातला जावा यासाठी दावणगाव येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी धनाजी मुळे, तानाजी फुले,बालाजी हुरूसनाळे,संतोष पताळे,कमलाकर फुले,माधव भंडे, दिनकर बिरादार, प्रदीप पाटील,विकास भंडे, सोनू जाधव, गणेश भंडे, बालाजी जाधव, सतीश हुरूसनाळे आदी उपस्थित होते.