*जिल्ह्यातील 69 व्यक्तींच्या स्वाबपैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 अनिर्णीत* *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर* 

*जिल्ह्यातील 69 व्यक्तींच्या स्वाबपैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 अनिर्णीत*


*पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर* 


*आज एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 62, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 174 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13*


लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण 69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , 03 नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीची 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 07 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन व्यक्ती ममदापुर येथील असून एक व्यक्ती निवासी डॉक्टर असून ते दिनांक 10 जून 2020 रोजी मुंबई येथून प्रवास करून आले असून मागील सात दिवसापासून ते कर्त्याव्यवर उपस्थित नव्हते.(त्यांचा Duty Off होता ) तीन दिवसापासून सर्दी व ताप आल्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची आज तपासणी केली असता त्यांचा आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज जिल्ह्यात नवीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


*आज एकूण 16 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*


आज लातूर जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक दिवस असून जिल्ह्यातून 16 कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून हनुमान नगर चे 6 रुग्ण, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाभळगाव 2, हिप्परगा 1, भाग्यनगर 1 व भुसार लाईन चा 1 असे एकूण 5 रुग्ण, आतिरिक्‍त एमआयडीसी मध्ये 1000 मुला मुलींच्या वसतिगृहात निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटर मधून क्रांतीनगर चे 2 व चौधरी नगर चा 1 असे 3 रुग्ण व दापका तालुका निलंगा येथील कोविड केअर सेंटरमधून 2 रुग्ण असे एकूण आज 16 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 62, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 174 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 अशी आहे.


 


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image