श्यामची आई" ही काळाच्या पलीकडे प्रभावी: धनंजय गुडसूरकर 

"श्यामची आई" ही काळाच्या पलीकडे प्रभावी: धनंजय गुडसूरकर


उदगीर : श्यामची आई ने केलेली मुल्यांची पेरणी कालातीत आहे,हे संस्काराचे मोती नव्या पिढीसाठी प्रेरक असून श्यामची आई ची कृतीयुक्तता ही हे संस्कारपीठच आहे" असे प्रतिपादन साने गुरूजींच्या साहित्याचे अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी आॕनलाईन संवादात केले.


साने गुरुजींच्या स्मृतीदिनानिमित्त "आई श्यामची व मम्मी आजची" या विषयावर गुडसूरकर यांच्या आॕनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते."दीडशे वर्षाआधी जन्मलेल्या आणि शतकापूर्वी हे जग सोडून गेलेल्या य आईच्या विचाराची आज उपयुक्तता काय?"असा प्रश्न आज उपस्थित होणे स्वाभाविक आहे."मात्र या माऊलीने वर्तनातून केलेले संस्कार आणि विचारांची पेरणी ही काळाच्या कसोटीवर टिकणारी आहे.सभोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना त्या परिस्थितीला शरण न जाता आपल्या विचारांशी व तत्वांशी कायम राहून तिने केलेला संघर्ष श्यामला घडवून गेला.एका बुज-या मुलाचे रुपांतर सेनानी मध्ये झाले.सामाजिक भूमिका घेताना कणखरपणे जगणाऱ्या साने गुरुजींची जडणघडण आईच्या कणखरपणात झाली होती"याकडे गुडसूरकर यांनी लक्ष वेधले.


आज संसाधने व माध्यमांमुळे सामाजिक विचार सहज पोचतो आहे.मात्र त्या काळात विवेकी विचारांची पेरणी करणारी सामान्य कुटुंबातील ही स्री विवेकाचं विद्यापीठ ठरते. विचारांवर चालणाऱ्या व कृतीतून त्याची अंमलबजावणी करणाऱ्या या मातेबद्दलचा आदर अधिक वाढतो असे गुडसूरकर पुढे बोलताना म्हणाले.शिकलेले लोक बिघडतात म्हणून शिक पण चांगला हो हा सल्ला ती आपल्या मुलांना त्याकाळात देते,दुर्दैवाने तिची भिती आज खरी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मोह सोडणे म्हणजे धर्म अशी धर्माची सहजसोपी व्याख्या करणारी यशोदामाता चिंतनाच्या पातळीवर श्रेष्ठ ठरते असे सांगून आपला पाल्य श्याम होणार नसला तरी किमान संवेदनशील माणूस व्हावा यासाठी स्वयंव्यग्रता सोडून लेकरांशी संवादाचा सेतु उभारण्याचे आव्हान आजच्या ममीपुढे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवाजी बेडगे,मुरलीधर बेडगे,मयुर कुलकर्णी ,सांब शास्री,देविदासराव नादरगे,प्रा.सुनील वट्टमवार,श्रीकांत हाळ्ळे ,यश शास्री,मनोहर कुलकर्णी ,रुपा बासरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज