मुख्याधिकारी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरात विविध उपक्रम: वृक्षारोपण, रक्तदान शिबीर संपन्न

मुख्याधिकारी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरात विविध उपक्रम:


वृक्षारोपण, रक्तदान शिबीर संपन्न


उदगीर : उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरात विविध सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला तर पालिकेच्या टाकी परिसरात पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.


शहरातील पर्यावरणवादी असलेल्या ग्रीन आर्मी या संस्थेच्या वतीने सिंचन वसाहतीच्या परिसरात मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अजय गुजराथी, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, विश्वनाथ मुडपे, सुमन राठोड, ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अनिल भिकाने, व्ही. एस. कुलकर्णी, विश्वनाथराव बिरादार, विक्रम हलकीकर, ज्ञानोबा कोटलवार, शोभा कोटलवार, वर्षा कोटलवार, रुपाली पाटील, सिद्धेश्वर पैके, अर्चना पैके, महादेव बिरादार, चंद्रकला बिरादार, सुरेखा गुजलवार, सूनन्दा सरदार, बाबासाहेब सूर्यवंशी, विवेक वाघ, चंद्रकांत उप्परबावडे आदी उपस्थित होती.


उदगीर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, नगरसेवक बापूराव यलमटे, मनोज पुदाले, फैय्याज शेख, फैजुखा पठाण, माजी नगरसेवक गजानन सताळकर, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, उद्योजक विजयकुमार पारसेवार, रोटरी क्लबचे माजी सचिव रवींद्र हसरगुंडे, यांच्यासह आर्य वैश्य समाज युवक मंडळाचे श्रीकांत पारसेवार यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांनी मुख्याधिकारी राठोड यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.


लॉयनेस क्लब उदगीरच्या वतीने मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा पब्लिक स्कुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड, सुमन राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, सुनील हवा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन लॉयनेस क्लब उदगीर अध्यक्षा दिपाली औटे, महात्मा पब्लिक स्कूलच्या संचालिका संगीता नेत्रगावे पाटील, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय समन्वयक अभिजीत औटे यांनी केले होते.या वेळी लॉयनेस क्लब उदगीर सह सचिव चंद्रकला बिरादार, सह कोषाध्यक्ष सुनीता पंडित, चंचला हुगे, वर्षाराणी धावारे, महेश धावारे, पोलिस मित्र शेख मोहम्मद, मानकोळे नारायण उपस्थित होते.


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image