प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगराध्यक्ष बागबंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण : मनोज पुदाले यांचा स्वनिधी: जागतिक पर्यावरण दिन

 


प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगराध्यक्ष बागबंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण


मनोज पुदाले यांचा स्वनिधी: जागतिक पर्यावरण दिन


उदगीर : आज जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


प्रभाग ७ चे नगरसेवक मनोजदादा पुदाले यांच्या पुढाकाराने व स्वनिधी तून शासकीय धान्य गोदामाच्या समोर गेल्यावर्षी वृक्षारोपण करण्यात आले होते. ते यावर्षी सुस्थितीत आहेत आणि वाढत आहेत. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी तिथे उर्वरित जागेत आणखीन काही झाडांची व फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली. या लावलेल्या झाडांची व पूर्वी लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी रवी मलगे यांनी घेतली असून ते ही झाडे टिकून आहेत भविष्यात ही सुस्थितीत रहातील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


यावेळी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, वित्त व नियोजन सभापती निवृत्ती सांगवे, नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, माजी नगरसेवक गजानन सताळकर, नगरपालिकेचे अभियंता खटके प्रशांत रंगवाळ, पालिका कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज