पाणीपुरवठा पाईपलाईन ची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेविका चिमेगावे यांचे उपोषण: प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे 


उदगीर: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजने अंतर्गत होत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट अवस्थेत असून सदरील काम पूर्ण करावे या मागणीसाठी प्रभागाच्या नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चिमेगावे यांनी आपले उपोषण मागे घेतले.


उदगीर शहरात मागच्या वर्षभरापासून अटल अमृत योजनेतून नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सदरील पाईपलाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामार्फत होत असून शहरात अनेक ठिकाणी हे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अटल अमृत योजनेतून टाकण्यात येत असलेले पाईपलाईनचे काम अर्धवट राहिली असून ते त्वरित पूर्ण करावे यासाठी प्रभागातील नगरसेविका अरुणा चिमेगावे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या उपविभागीय अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केली होती, मात्र त्यांच्या पत्राची कसलीच दखल घेतली न गेल्याने चिमेगावे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कार्यालयासमोर अरुणा चिमेगावे यांनी प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण सुरू केले.


या उपोषणस्थळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी आ. गोविंद केंद्रे, न. प. चे उपाध्यक्ष सुधीर भोसले, प. स. सभापती विजय पाटील, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, रामेश्वर पवार, रुपेंद्र चव्हाण, प्रा. बालाजी सूर्यवंशी, बालाजी गवारे यांच्यासह मान्यवरानी भेटी देऊन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.


उपोषण चालू असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी अरुणा चिमेगावे यांची भेट घेऊन पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.


Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image