माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 

माझ्या प्रकृतीच्या बातम्या निराधार : मुख्याधिकारी भारत राठोड 


उदगीर : मागील दोन दिवसापासून शहरात काही जणांकडून माझ्या प्रकृतीबाबत समाज माध्यमामार्फत उलट-सुलट माहिती पसरविण्यात येत आहे, त्याचे खंडन करताना उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड आमच्याशी बोलताना म्हणाले की, ईश्वर कृपेने व उदगीरकर यांच्या आशीर्वादाने माझी तब्येत ठणठणीत असून मी लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे समाजमाध्यमावरून येणाऱ्या उलट-सुलट बातम्या या निराधार व खोट्या माहितीच्या आधारावर आहेत. कृपया यावर विश्वास ठेवू नये.


पुढे बोलताना ते म्हणाले की मागील अडीच महिन्याच्या लॉक डाऊन च्या काळात मी सातत्याने उदगीरकर जनतेच्या सेवेत दिवस-रात्र काम केले आहे. उदगीर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या महिलेच्या अंत्यविधीला मी स्वतः उपस्थित राहिलो आहे. परंतु काही जणांकडून मला त्रास देण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमांचा वापर करून माझ्या प्रकृतीबद्दल चर्चा केल्या जात आहेत. उदगीर शहरातील जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती उत्तम असून आगामी काळात सुद्धा मी उदगीरकर जनतेच्या सेवेत कायम राहणार आहे. उदगीरकर जनतेने आपले आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी ठेवावेत, असे भावनिक आवाहनही यावेळी भारत राठोड यांनी केले आहे.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image