हे श्रेय सर्वांचे.... औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम  

हे श्रेय सर्वांचे....


औराद रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम


औराद शहा, : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने औराद पंचक्रोशीत ग्रामीण भागातून, एकाच दिवशी महाराष्ट्रातील एकाच दिवसाचे सारे विक्रम मोडीत काढून, रक्तदानाच्या इतिहासामध्ये ब्लड बॅकेच्या नोंदीनुसार 503 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. ग्रामिण भागातल्या या तांड्यावस्तीवरील रक्तदान चळवळीमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 'आम्ही रक्तदाते' अंतर्गत औराद शहाजानी, सावरी, तगरखेडा, मानेजळगाव, शेळगी या पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळाला.ब्लड बॅकेच्या उपलब्ध साधन सुविधेच्या अभावामुळे काही रक्तदात्यांना पुढच्या टप्प्यातील रक्तदानासाठी थांबवावे लागले असा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. रक्तदानाचे महत्त्व, त्याचे फायदे तळागाळातील शेवटच्या माणसाला प्रत्यक्ष भेटून समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही रक्तदाते या ग्रुपच्या वतीने उदंड प्रतिसाद लाभला. सर्वच जाती धर्मातील लोकांनी विशेषतः महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग दिला. यासाठी माऊली ब्लड बँक, भालचंद्र ब्लड बँक, सरकारी बॅंक यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान बुथ प्रमुख, आशाताई, अंगणवाडीताई अशा अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले. खरे पाहता हे श्रेय सामाजिक बांधिलकी जोपासून माणुसकीसाठी काम करणाऱ्या सर्वांचेच आहे, अशी भावना या रक्तदान चळवळीतून जनतेमधे निर्माण झाली आहे...