उदगीर शहरात आज चौघांचा मृत्यू

उदगीर शहरात आज चौघांचा मृत्यू


उदगीर: शहरातील कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा तर रुग्णालयात दाखल करत असताना दोघांचा आशा एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याने उदगीर शहर व तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


उदगीरच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले 253 रुग्ण कोरोना बाधित असून यापैकी 160 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 18 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अकरा रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र रेफर करण्यात आले असून उर्वरित रुग्णांमध्ये 25 रुग्णावर कोविड रुग्णालयात तर 32 तोंडार पाटी येथील कोविड सेंटरवर उपचार सुरू आहेत.


आज येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गणेश नगर उदगीर येथील साठ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खडकाळी गल्ली येथील पन्नास वर्षे वय असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोघांचेही अहवाल प्रलंबित आहेत. हळद वाढवणा (ता.जळकोट) येथील ६० वर्षीय तर बापशेट वाडी (ता.मुखेड) येथील ६५ वर्षे पुरुषाचा रुग्णालयात दाखल करत असताना मृत्यू झाला आहे.