प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मुदतवाढ द्यावी - विवेक सुकने 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मुदतवाढ द्यावी - विवेक सुकने 


उदगीर - गेल्या काही दिवसापासून कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खरीप हंगामाच्या पिकांचा पीक विमा भरण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना शेतकऱ्याना करावा लागत आहे . सध्या 31जुलै पर्यंत जिल्ह्यात लाँकडाउन आहे .पिकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत वाढवावी व दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांला दिलासा द्यावा अशी मागणी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परीषदेचे प्रदेश सचिव विवेक सुकने यांनी केली आहे .


      सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून ,आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी भयभीत झालेला आहे. अशा परीस्थितीत बँकासमोरील पिकविमा भरण्यासाठी होत असलेली गर्दी तसेच गावागावातील सोसायट्या समोर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी व आधिच दुबार पेरणी मुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे.,विमा भरण्यासाठी पैशाची, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यासाठी पिकविम भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी व बँकासमोरील व सोसायटी समोरील होणारी गर्दी कमी करावी अशी मागणीही विवेक सुकने यांनी केली आहे.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज