श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.

श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम...


उदगीर,


    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेबुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 91 टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह 3 विध्यार्थी आणि प्रथम श्रेणीत 27 विध्यार्थी आले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 93 टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह 7 विध्यार्थी आणि प्रथम श्रेणीत 30 विध्यार्थी आहेत. कला शाखेचा निकाल 66 टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह 1 विध्यार्थी आणि प्रथम श्रेणीत 4 विध्यार्थी आले आहेत.तसेच उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 91 टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह 9 विध्यार्थी आणि प्रथम श्रेणीत 52 विध्यार्थी पास झालेले आहेत.


विज्ञान शाखेत कु.साक्षी नवनाथ गायकवाड 82% गुण मिळवून प्रथम, कु.आयेशा सलीम पटेल 80% गुण मिळवून द्वितीय तर कु.शरयू धनंजय मलशेट्टे 76% गुण मिळवून तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेत कु.स्वाती संजय सुरवसे 83% गुण घेवून प्रथम, कु. राधा राजकुमार चिवटे 82% गुण घेवून द्वितीय तर कु.प्रतीक्षा बब्रुवान लोहकरे 79% गुण घेवून तृतीय आली आहे.


कला शाखेत मंगेश बालाजी धोत्रे 76% गुण घेऊन प्रथम,कु.स्वाती अनंत शिंदे 66% घेऊन द्वितीय तर प्रमोद प्रकाश सूर्यवंशी 65% गुण घेऊन तृतीय आला आहे. तसेच उच्च माध्यमिक व्यवसायिक अभ्यासक्रमांतर्गत विनोद गणपतराव शृंगारे या विधार्थ्याने 84% गुण घेऊन प्रथम, कु.सय्यदा मुस्कान हाश्मी या विधार्थिनीने 81% गुण घेऊन द्वितीय तर कु.चंद्रभागा गंगाधर भेंडेगावकार 79% गुण घेऊन तृतीय आली आहे.


       त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऑड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.डी.लोहारे,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, पर्यवेक्षक प्रा डी.एस.मुंदडा, पर्यवेक्षक प्रा एस.के.फडतरे, कार्यालयीन अधीक्षक एस. बी. धनुरे, ग्रंथपाल प्रा.ए.जे. रंगदळ, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज