*देवणी येथे नाफेडअंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू* 

*देवणी येथे नाफेडअंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू* 


 


देवणी: खरीप हंगामात पेरणी झालेल्या मूग, उडीद व सोयाबीन या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी भोपणी अंतर्गत देवणी येथील रसिका वेअरहाऊस येथे नाफेड मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्यात आले आहे.हमीभाव मुग- ७१९६ रुपये, उडीद -६००० रुपय व सोयबिन- ३८८० रुपय शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रसिका वेअर हाऊस येथील नाफेड खरेदी केंद्रावर १-ऑक्टोबर- 2020 या तारखे पासुन ऑनलाइन नोंदणी सुरु करन्यात आली आहे.तरि देवनी तालुक्यातिल सर्व शेतकर्यानी नोंदणी करुन घ्यावें असे आवाहन विविध कार्यकारी सेवा सोसायटी भोपणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


पत्ता-बोरोळ रोड,रसिका वेअर हाउस देवनी


सम्पर्क- 9637318500, 9765282909