चंद्रदीप नादरगे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान

चंद्रदीप नादरगे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान


उदगीर: उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालयातील कलाशिक्षक चंद्रदीप बालाजी नादरगे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीतर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार लातूर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. 


नादरगे चंद्रदीप यांनी कोविड-19 या आपत्तीजनक परिस्थितीत वेगवेगळ्या पोस्टर्सच्या माध्यमातुन कोरोना जनजागृतीचा संदेश दिला आहे. ऑनलाइन प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मास्क स्वतः बनविणे व त्याचा वापर काळजीपूर्वक करणे. तसेच स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करणे अशा प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थी/पालकांना कोरोना आजारासंदर्भात माहिती देऊन सामाजिक कार्य केले. याच बरोबर जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थापासून होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली, जागतिक मलेरिया दिनानिमित्त स्वच्छतेची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली, ऑनलाइन उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक राख्या, ज्येष्ठा गौरी निमित्त (प्लास्टिकच्या पाना फुलांना आळा) निसर्गनिर्मित पनाफुलांची सुंदर सजावट, राष्ट्रध्वजाची व स्वातंत्र्य दिनाची कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना माहिती दिली, गंदगीमुक्त भारत या उपक्रमांतर्गत चित्रातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश, नारळाच्या करवंटी, टरपलापासून गणपती बनवून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती विषयी मार्गदर्शन असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक, राष्ट्रीय, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. या सेवेच्या सन्मानार्थ कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून नादरगे चंद्रदीप यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, कृषि सभापती गोविंदराव चिलकुरे, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, माजी समाजकल्याण सभापती संजयजी दोरवे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष चंदू घोडके, सरचिटणीस वाल्मिक पंदे, कार्याध्यक्ष बापूराव चामले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर अध्यक्ष मारोती लांडगे आदीची उपस्थिती होती.


कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, संस्थेचे सचिव - विनायकरवजी बेंबडे, पंचायत समिती उदगीरचे माजी उपसभापती रामदास बेंबडे, मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच मित्र परिवार आणि पत्रकार बांधवांनी त्याचे अभिनंदन केले.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज