अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा
राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत -राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर-मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने उदगीर, जळकोट परिसरातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकाचा समावेश आहे या सर्व नुकसान झालेल्या पीकाचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर तालुक्यातील तोगरी,मोघा, रावणगाव या सर्कल मघ्ये मागील आठवड्यात ढगफुटी सद्श्य पाऊस झाला आहे या पावसाने परिसरातील प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 1257 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे उदगीर परिसरात पावसाची सरासरी सुमारे 740 मी.मी आहे आतापर्यंत जवळपास 100टक्के पाऊस या परिसरात झाला आहे मागील काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस, वातावरणातील आर्द्रता ,यामुळे सोयाबीन पीकाचे नुकसान झाले आहे या पीकास कोंब फुटत आहेत, तर मुगाची प्रतवारी घसरली आहे या पिकाचे शासन स्तरावरून पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा