मारोतीराव मादळे यांचे निधन
उदगीर : येथील पत्रकार सुनील मादळे यांचे वडील मारोतीराव मादळे यांचे रविवारी पहाटे निधन झाले. तलाठी म्हणून त्यांनी अनेक वर्षे सेवा करून निवृत्त झाले होते. त्यांच्या पार्थिवावर जळकोट रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
मादळे परिवाराच्या दुःखात सा. निळकंठेश्वर समाचार परिवार सहभागी आहे.